Search

News Update

30/03/2023

Talathi Bharati तलाठी भरती बद्दल नवीन अपडेट जाहीर २०२३

महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे ४५०० हून अधिक तलाठ्यांची नियोजित पद भरती पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची  शक्यता


आहे. तलाठी पदे भरण्यासाठी राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
महाराष्ट्र राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांत पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पदभरती बाबत चर्चा चालू आहे. याबाबत राज्यपालांनी २०१९ मध्ये आदेश काढून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. 

या आदेशानुसार महारष्ट्र राज्य शासनाने पेसाबाबत मागील महिन्यात अध्यादेश काढलेला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या पेसा बिंदु नामावलीमध्ये काही दुरुस्त्या आहेत किंवा कसे, बिंदु नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती आहेत. या रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे. याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतरच तलाठी पदभरतीबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे असे वाटते.



No comments:

Post a Comment

Next Post

RRB Technician Bharti 2026 – रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 रेल्वेमध्ये 6565 पदांची मोठी भरती, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी...