नमस्कार शेतकरी
मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 2023. कुसुम सोलर पंप ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना (वर्ष 2023) तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि सोलार पंप मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.
मित्रांनो पाहु काय आहे कुसुम
योजना, लाभार्थी पात्रता (eligibility), आवश्यक दस्तावेज(Documents), कुसुम सोलर पंप या योजनेचे लाभ
कोणते आहे. अर्जासाठी लागणारी फीस किती असणार आहे, कुसुम सोलार कृषी पंप योजना
महाराष्ट्र (2023) साठी अर्ज कसा
करायचा, शंका निवारण्यासाठी
हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
कुसुम सोलर पंप
योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र
सरकारची योजना आहे. कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे. या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे, हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय आहे.
![]() |
बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
अनुदानाचे स्वरूप
सरकार शेतकर्यांना
६०% अनुदान देईल
३०% खर्च सरकार
कर्ज स्वरूपात देईल.
शेतक्यांना
प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते ?
१) अटल सौर कृषी
पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर
न झालेले अर्जदार
२) बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी
नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच
पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
३) ज्या
शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत
अर्जासाठी पात्र असतील.
४) २.५ एकर
शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन
असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, एकर पेक्षा जास्त
असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी
अनुदान देय असेल.
![]() |
Annasaheb Patil Tractor Yojana अण्णासाहेब पाटील महामंडळ अधिक माहितीसाठी क्लिक करा |
कुसुम योजनेचे वैशिष्ट्य काय आहे ?
पारेषण विरहित
३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या
योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना
स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
सर्वसाधारण
प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या
लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
शेतकऱ्यांना
त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा
जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
अर्जासाठी आवश्यक पात्रता
१) अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
२) सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे
प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
३) अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा
वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २
मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
४) सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २
मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
५) जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे
विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १
कोटी रुपये आहे.
६) प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक
आहे.
कुसुम सोलार पंपयोजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
१) ७/१२ उतारा
(विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवशयक)
२) आधारकार्ड
प्रत
३) रद्द केकेली
धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत
४) पासपोर्ट
आकाराचा छायाचित्र
५) शेत जमीन /
विहीर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
कुसुम सोलार पंप योजने ची अर्ज फीस
- 1. ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
- 2. १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
- 3. १.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
- 4. २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी
योजनेसाठी अर्ज करा
कुसुम सोलार पंप योजनेची
ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे.
अधिक माहिती साठी
आपण या संकेतस्थळा ला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.
योजने सबंधित काही
अडचणी असतील तर ऑफिसियल वेबसाइट वर हेल्पलाईन नंबर देलेले आहेत त्यावरती
लाभार्त्यानी संपर्क करावा.
स्टाफ सिलेक्शन कमिशन 1600 जागांसाठी भरती 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 285 जागांसाठी भरती
SSB Recruitment 2023
Bank Of Baroda Recruitment 157
Annasaheb Patil Tractor Yojana
भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 जागांसाठी भरती
_2.png)


No comments:
Post a Comment